Skip Navigation Links
Home
Contact Us
About Us
Examinations
Exam-Info
Results
Tenders
  प्रसिद्धी निवेदन
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (राज्यस्तर)
इ.८ वी दि. ८ नोव्हेंबर २००९ ची निवड यादी

 
             महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद; पुणे यांचे मार्फ़त ८ नोव्हेंबर २००९ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (राज्यस्तर) इ. ८वी परीक्षेची निवड यादी शनिवार दिनांक ०३/०४/२०१० रोजी दुपारी ३.०० वाजता जाहीर होणार आहे.
          NTS इ.८ वी परीक्षेसाठी-५८१४२ विद्यार्थी आणि NMMS इ.८ वी साठी ६३०२६ विद्यार्थी नोंदविण्यात आले. NTS राष्ट्रीय परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून NTS इ.८ वी उपरोक्त दोन्ही परीक्षामधून ४९६ विद्यार्थी कोठा एन.सी.ई.आर.टी., नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील ३८५, अनुसूचित जाती ७४ व अनुसूचित जमाती ३७ अशा एकूण ४९६ विध्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित संवर्गात अपंगासाठीचे ३% आरक्षण समाविष्ट आहे. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा रविवार दि. ०९ मे २०१० रोजी पुणे व मुंबई येथील केंद्रावर होणार आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनां स्वतंत्ररीत्या कळवीण्यात आलेले आहे. ही निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वर शनिवार दिनांक ०३/०४/२०१० रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून पाहता येईल. वेबसाईटचा पत्ता www.ms-ce.org हा आहे.
          महाराष्ट्र राष्ट्रीय प्रज्ञाशोध इ. ८वी (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी पुणे व मुंबई या दोन ठिकाणी परीक्षा केंद्रे ठेवले आहे. राष्ट्रीयस्तर परीक्षेतून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचीच जुलै/ऑगस्ट महीन्यात मुलाखत घेण्यात येईल. त्यातून पात्र ठरलेले विद्यार्थी ’शिष्यवृत्तीधारक’ होतील. राष्ट्रीय पातळीवर NTS इ.८ वी साठी - १००० शिष्यवृत्त्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मिळवतात. सदरची शिष्यवृत्ती अत्यंत प्रतिष्टेची मानण्यात येते.
          गतवर्षी महाराष्ट्रातून सदर परीक्षेत इ.८ वी च्या २८५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ही अभिमानास्पद बाब आहे.
 
 

(सर्जेराव जाधव)             
आयुक्त,                      
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१.
 
     
  राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा - निवड यादी CLICK HERE  

Last update on 21/10/2011
Best viewed @ 1024 x 768 pixels

Copyright © Maharashtra State Examination Council.All rights are reserved